ऑटिझमचे प्रकार
- ऑटिस्टिक डिसऑर्डर (Autistic disorder)
- रेट्स डिसऑर्डर (Rett's Disorder)
- अस्परगर्स सिंड्रोम (Asperger's Syndrome)
- चाईल्डहूड डिसइन्टिग्रेटिव्ह डिसऑर्डर (CDD)
ऑटिझमची कारणे
काही प्रमुख कारणांवर नजर टाकूया- कधी कधी जेनेटिक कारणांमुळे मुलाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याला ऑटिझम ही समस्या होऊ शकते.
- ज्या स्त्रियांना गरोदरपणात भरपूर स्ट्रेस येतो किंवा ज्यांची शारीरिक क्षमता कमजोर असते अशा स्त्रियांच्या बाळांमध्ये ऑटिझमची समस्या वाढू शकते.
- मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे केमिकल्स जसे की सेरोटोनीन, डोपामाईन आवश्यक प्रमाणात निर्माण न झाल्यास ही समस्या उद्भवू शकते.
- जर नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाचा जन्म झाला तर त्याला ऑटिझम होण्याचा धोका असतो.
- मुलांसोबत क्वालिटी टाईम न घालवल्यासही हळूहळू ऑटिझमची समस्या निर्माण होऊ शकते.
ऑटिझमची लक्षणे
लहान मुले साधारणपणे एका वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच रांगू लागतात, हसतात, बोलायचा प्रयत्न करतात. आपल्या पालकांना प्रतिसाद देतात. पण या गोष्टी दिसत नसल्यास तो ऑटिझमचा संकेत असू शकतो. याशिवाय ऑटिझमची अन्य काही लक्षणे आहेत;- बौद्धिकदृष्ट्या परिपक्व नसणे
- कोणालाही न भेटता एकटे राहणे
- डोळ्यात थेट न पाहणे, न बोलणे
- इतरांसोबत मिसळण्याची इच्छा नसणे
- एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे
- कोणतीही भावना व्यक्त न करणे
- आवाजांकडे दुर्लक्ष करणे
- नीट बोलता न येणे आणि विनाकारण रडणे
मुलांची योग्य वाढ व्हावी म्हणून त्यांना खालील पदार्थ खायला द्या
- कुपोषण टाळण्यासाठी बाळाला पहिले सहा महिने फक्त आईचे दुध दिले पाहिजे.
- निरोगी वाढीसाठी लहानपणापासूनच मुलांना पौष्टिक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यांना मानसिक व शारीरिक वाढीची संधी मिळते.
- दैनंदिन आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर पुरेशा प्रमाणात आहेत याची खात्री करा.
- मुलांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी झिंक (Zinc) आणि (Iron) लोहयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात द्यावे.
- फुलगोबी, ब्रोकोली, मिरपूड आणि हिरव्या पालेभाज्या, भोपळ्याच्या बिया, अंडी आणि मांस मुलांच्या वाढीस मदत करतात.
- संत्री, रताळे, अननस, पेरू, स्ट्रॉबेरी, पपई आणि इतर प्रकारची फळे द्यावीत.
- बीन्स, शेंगा, मशरूम आणि सूर्यफुलाच्या बिया, ज्यात सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे ते, लहान मुलांना द्यावे.
- मुलांना अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-ई समृध्द अन्न खायला दिल्याने त्यांची मज्जासंस्था मजबूत होतेच पण प्रतिकारशक्तीही वाढते.
- Vitamin K2 समृद्ध अन्न दिल्यास मुलांची हाडे मजबूत होतात.
ऑटिझम होऊ नये म्हणून काय करावे?
- सर्वप्रथम रेग्युलर प्रेग्नन्सी टेस्ट कराव्यात आणि गर्भाशयातील बाळाच्या वाढीचे नियमित निरीक्षण देखील करावे.
- गरोदरपणात सकस आहार घेण्यासोबतच स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायामही करायला हवा.
- धूम्रपान, अल्कोहोल आणि ड्रग्ज सेवन टाळावे.
- डॉक्टरांनी सांगितल्यानुसार काही सप्लीमेंटरी डायट घेऊन ऑटिझमचा धोका कमी केला जाऊ शकतो.
- गरोदरपणात प्रदूषणापासून दूर राहावे.
- गरोदर महिलांनी विशिष्ट प्रकारच्या रोगांसाठी लसीकरण घेणे अनिवार्य आहे.
- बाळाच्या वागण्यात, बोलण्यात काही विचित्र गोष्टी दिसल्यास वेळीच डॉक्टरांना दाखवावे.