तुम्हाला ब्रेन एन्युरिझम या आजाराची सौम्य/ लक्षणे माहित आहेत का?

तुम्हाला ब्रेन एन्युरिझम या आजाराची सौम्य/ लक्षणे माहित आहेत का?

Dr. Akash Santosh Prabhu November 6, 2024
अनेक वर्षांपासून ब्रेन एन्युरिझम हा आजार जगभरातील लाखो लोकांसाठी एक गंभीर मात्र अनुच्चारित धोका बनला आहे.  कोणतीही चेतावणी, चिन्हं किंवा लक्षणांशिवाय ते विकसित होऊ शकतात, ही वस्तुस्थिती त्यांना आपल्या आरोग्यासाठी धोकादायक बनवते. पण ब्रेन एन्युरिझम हा आजार गंभीर असून देखील अनुच्चारित का आहे?

ब्रेन एन्युरिझम म्हणजे काय?

ब्रेन एन्युरिझम ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूच्या धमनीच्या भिंतीतील कमकुवत जागा बाहेरून फुगते व फुग्यासारखी रचना तयार करते. हे फुगे आकारात भिन्न असू शकतात आणि ते दोन प्रमुख प्रकारचे असतात
  • अखंड धमनी विस्फारण -
यामध्ये त्या अखंड राहतात आणि कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत नाही. मात्र त्या फुटण्याचा धोका असूनही अखंड धमनी विस्फारणासह अनेक लोक कोणतीही लक्षणे न अनुभवता सामान्य जीवन जगतात.
  • खंडित धमनी विस्फारण -
जेव्हा धमनी विस्फारणात धमनी फुटते किंवा आसपासच्या मेंदूच्या ऊतींमध्ये ररक्तस्त्राव होते, तेव्हा जीवघेणी समस्या निर्माण होते. या रक्तस्त्रावामुळे मेंदूचे नुकसान होऊन रुग्ण कोमात जाऊ शकतो.

ब्रेन एन्युरिझम आजाराची लक्षणे काय आहेत?

ब्रेन एन्युरिझम आजाराचे मुख्य आव्हान हे त्यांच्या दीर्घ काळासाठी स्थिर राहण्याच्या क्षमतेमध्ये आढळून येते. जवळपास 90% लोकांना अखंडित मेंदूतील धमनी विस्फारण आजारात कोणतीही सहज लक्षात येण्याजोगे लक्षणे उद्भवत नाहीत. यामुळे ते फुटण्याआधी त्यांचे निदान करणे कठीण होते, परंतु ही गोष्ट वारंवार घडत नसली तरीही काही वेळा धमनी विस्फारणाच्या पूर्व चेतावणीचे संकेत  मिळू शकतात.
  • ब्रेन एन्युरिझम सौम्य लक्षणे :
हा आजार सामान्य जरी वाटत नसला तरी, मेंदूच्या काही अखंड धमनी विस्फारणामुळे आसपासच्या नसा किंवा मेंदूच्या ऊतींवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे खालील लक्षणे दिसून येतात :
  • डोकेदुखी:
हे सर्वात सामान्य लक्षण आहे, ज्याचे वर्णन अनेकदा अचानक, तीव्र डोकेदुखी म्हणून केले जाते तर काही वेळा "तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट डोकेदुखी" म्हणून देखील केले जाते.
  • दृष्टीत बदल होणे :
यामध्ये अस्पष्ट दृष्टी, दुहेरी दृष्टी किंवा पापणी खाली लवणे/ पडणे  यांचा समावेश असू शकतो.
  • डोळ्याभोवती वेदना होणे:
तुम्हाला एका डोळ्याच्या मागे किंवा वर सतत वेदना जाणवू शकतात. तुम्हाला कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांच्या निदानासाठी कोल्हापुर मधील सर्वोत्तम न्यूरोलॉजी हॉस्पिटलशी संपर्क साधा.
  • चेहऱ्याचा सुन्नपणा किंवा अशक्तपणा:
याचा परिणाम चेहऱ्याच्या एका बाजूला आणि हसताना किंवा चेहऱ्याचे स्नायू झुकल्यास त्रास होऊ शकतो.
  • झटका/ पेटका :
काही प्रकरणांमध्ये, मेंदूतील धमनी विस्फारित नसल्यामुळे झटका येऊ शकतो.
  • मान अवघडणे :
हे लक्षण सामान्य नसले तरीही मेंदूच्या अखंड धमनी विस्फारणात उद्भवू शकते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ही लक्षणे इतर विविध परिस्थितींमुळे देखील होऊ शकतात. तथापि, आपण त्यापैकी कोणतेही अनुभवत असल्यास, विशेषतः एकत्रितपणे ब्रेन एन्युरिझम आजाराचे अचूक निदान मिळविण्यासाठी आपण त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची वेळ आली आहे, हे समजून घ्या.

ब्रेन एन्युरिझम संभाव्य कारणे कोणती आहेत?

ब्रेन एन्युरिझम सहसा निश्चित कारण नसते, परंतु हे सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये आढळून येतं, कारण वयामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात ज्यामुळे ब्रेन एन्युरिझम होऊ शकतो.

ब्रेन एन्युरिझम तीव्रता/ आकार काय आहे?

ब्रेन एन्युरिझमची तीव्रता भिन्नभिन्न असते/ वेगवेगळ्या आकाराचे असतात
  • लहान धमनी विस्फारण :
हे 11 मिमी पेक्षा लहान असू शकतात आणि जवळपास पेन्सिल खोडरबरच्या आकाराचेही असू शकतात.
  • मोठे धमनी विस्फारण :
हे साधारणतः 11-25 मिमी व्यासाचे असू शकतात.
  • फार मोठे/ अवाढव्य धमनी विस्फारण:
या धमनी विस्फारणाचा व्यास 25 मिमी पेक्षा जास्त असू शकतो आणि एक चतुर्थांश पेक्षा मोठाही असू शकतो.

ब्रेन एन्युरिझम कसा वाढतो?

प्रत्येक ब्रेन एन्युरिझम वेगळ्या पद्धतीने वाढतो, काही आठवड्यात वाढू शकतात आणि काहींना कित्येक महिने ते अनेक वर्षे लागू शकतात. काही मेंदूचे धमनी विस्फार असे असू शकतात जे अजिबात वाढू शकत नाहीत. वाढीच्या आधारावर तुम्हाला त्यानुसार उपचारांची शिफारस केली जाऊ शकते, तज्ञांकडून अद्यावत/ प्रगतशील उपचारांसाठी कोल्हापूर येथे ब्रेन एन्युरिझम आजाराचे उपचार घ्या.

ब्रेन एन्युरिझम आजार झाल्याचे लवकर कसे शोधले जाईल?

मेंदूतील बहुतांश धमनी विस्फारण शांतपणे होत असते, लक्षणे असतानाही लवकर ओळखल्याने यशस्वी उपचारांच्या शक्यतांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात आणि गुंतागुंत होण्याचा धोका कमी करू शकतात. या आजाराचे लवकर निदान खालील गोष्टींद्वारे प्राप्त केले जाऊ शकते:
  • इमेजिंग चाचण्या:
यामध्ये सीटी स्कॅन, एमआरआय किंवा सेरेब्रल अँजिओग्राम यांचा समावेश असू शकतो, जे धमनी विस्फारणाची उपस्थिती आणि जागा शोधण्यासाठी मेंदू आणि रक्तवाहिन्यांना काळजीपूर्वक न्याहाळतात.

ब्रेन एन्युरिझम आजारासाठी उपचार पर्याय कोणते आहेत?

ब्रेन एन्युरिझमसाठी आकार, जागा आणि फुटण्याची शक्यता यावर अवलंबून विविध उपचार पर्यायांची शिफारस केली जाते, यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत :
  • सर्जिकल क्लिपिंग:
या प्रक्रियेमध्ये रक्त प्रवाह रोखण्यासाठी आणि फुटणे/ फाटणे टाळण्यासाठी धमनी विस्फारणाच्या मुळाशी एक लहान धातूची क्लिप ठेवली जाते.
  • एंडोव्हस्कुलर कॉइलिंग:
एंडोव्हस्कुलर कॉइलिंगमध्ये एक पातळ कॅथेटर धमनीमध्ये घातले जाते आणि धमनी विस्फारण झाल्याच्या जागी नेले जाते. नंतर कॉइल्स धमनी विस्फारण झालेल्या जागी रिलीज केले जातात, ज्यामुळे त्या जागी ते गाठ तयार होते आणि रक्त प्रवाह रोखला जातो.
  • निरीक्षण करणे:
काही प्रकरणांमध्ये धमनी विस्फारण लहान असल्यास आणि फुटण्याचा धोका कमी असल्यास, डॉक्टर त्वरित सर्जरी करण्याऐवजी नियमित निरीक्षणाची शिफारस करू शकतात.

जर तुम्हाला ब्रेन एन्युरिझम आजार झाल्याचे निदान झाले असेल तर काय करावे?

जर तुम्हाला मेंदूतील अखंडित धमनी विस्फार झाल्याचे निदान झाले असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी विचारविनिमय करून उपचार घेणे महत्त्वाचे आहे. यात अनेकदा खालील गोष्टी समाविष्ट असतात:
  • नियमित निरीक्षण करणे:
विशिष्ट परिस्थितीनुसार, धमनी विस्फारणाच्या आकाराचा आणि वाढीचा मागोवा घेण्यासाठी नियमित इमेजिंग चाचण्यांची शिफारस केली जाऊ शकते.
  • जीवनशैलीत बदल करणे:
रक्तदाब नियंत्रित ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे. या बाबी एक निरोगी जीवनशैलीत समाविष्ट केल्याने धमनी फुटण्याचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
  • औषधे:
काही प्रकरणांमध्ये, औषधे लिहून दिली जाऊ शकतात. ती लिहून दिल्याप्रमाणे घेणे आवश्यक आहे आणि ब्रेन एन्युरिझम पुनर्प्राप्ती ही अखंडित धमनी विस्फारणाच्या तुलनेत वेगळी असते, तज्ञांशी योग्यप्रकारे सल्लामसलत केल्याने तुमची सुधारणा निर्धारित करण्यात मदत होऊ शकते.

महत्त्वाची माहिती

ब्रेन एन्युरिझम आजारामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, परंतु सौम्य लक्षणे जाणून घेतल्याने तुम्हाला वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास संभाव्य जीवघेणी धमनी फुटण्याचा धोका टाळता येऊ शकतो. लक्षात ठेवा की, लवकर निदान होणे महत्वाचे आहे, त्यामुळे जर तुम्हाला काही लक्षणे आढळली तर त्वरित तपासणी करून उपचार घ्या.