हेमोरेजिक/ रक्तस्त्रावी (Bleeding) स्ट्रोक हे दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत :
- जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो तेव्हा त्याला इंट्राक्रॅनियल (Intracranial) रक्तस्राव म्हणतात.
- जेव्हा मेंदू आणि त्याच्या सभोवतालच्या पडद्यामध्ये रक्तस्त्राव होतो तेव्हा त्याला सबराक्नोइड (Subarachnoid) रक्तस्राव म्हणतात.
पुरुष आणि महिलांमध्ये आढळून येणारी स्ट्रोकची लक्षणे :
- शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा किंवा अशक्तपणा जाणवणे, विशेषत: चेहरा, हात किंवा पायांमध्ये.
- गोंधळ उडणे, बोलण्यात अडचण निर्माण होणे किंवा एखाद्याचे बोलणे समजण्यात अचानक अडचण येऊ शकते.
- एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी अचानक कमी होणे.
- चक्कर येणे, संतुलन गमावणे, समन्वय राखण्यात अभाव किंवा चालण्यात अडचण निर्माण होणे.
- पूर्वी कधीही न अनुभवलेली तीव्र डोकेदुखी होणे.